Thursday 10 July 2014

छायाचित्रण कार्यशाळा - किल्ले राजमाची






छायाचित्रण कार्यशाळा - किल्ले राजमाची

मंडळी

दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दि. 19 व 20 जुलै रोजी किल्ले राजमाची येथे छायाचित्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. श्री. उमेश दौंडकर व श्री. मनोज चव्हाण तज्ञ छायाचित्रकारांसोबत कोंडाणे लेण्यां ना भेट, राजमाची दुर्गभ्रमण, लॅण्डस्केप फोटोग्राफी, मॅक्रो फोटोग्राफी, नाईट फोटोग्राफी व नाईट ट्रेल असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल. 
या दोन्ही फोटोग्रार्फसची माहिती व कुशलता त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमधून आपणास पाहता येईल

. -: कार्यक्रमाचा आराखडा पुढीलप्रमाणे: - 

दिवस पहिला | 19/07/14 08:45 am: ठाणे स्टेशन येथे 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेरील इंडिकेटर खाली आपापले परतीचे 

08:45 am: ठाणे स्टेशन येथे 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेरील इंडिकेटर खाली आपापले परतीचे तिकीट काढून भेटणे.

सकाळी 09:05 च्या लोकलने कर्जत येथे प्रस्थान. 

12:00 pm: कर्जत येथे पोहोचून कोंदिवडे गावात आगमन. भोजनोत्तर कोंडाणे लेण्यांस भेट व फोटोग्राफी मार्गदर्शन. 

7:30 pm:. गडावरील उधेवाडी गावात पोहोचून विश्रांती

9:00 pm: भोजन व त्यानंतर नाईट ट्रेल. यादरम्यान बेडूक, साप तसेच इतर प्रकारांचे मॅक्रो फोटोग्राफी मार्गदर्शन. 

दिवस दुसरा

 | 20/07/2014 05:15 am: वेकअप कॉल आणि आवराआवर. 

06:00 am: गडावरील शिवमंदिरास भेट. पहाटेच्या फोटोग्राफीचे मार्गदर्शन. 

07:00 am:. नाश्ता व गडफेरी 

1:30 pm:. भोजनासाठी उधेवाडीत परत 

2:30 pm:. कर्जतकडे प्रस्थान

5:00 pm: कर्जत मधे आगमन. 

05:20 च्या लोकलने ठाण्याकडे प्रस्थान. 

7:00 pm:. ठाणे येथे आगमन 

शुल्कः 1100 / - (भोजन - नाश्ता, मुक्कामखर्च आणि तज्ञांचे मानधन.) 


सोबत आणायच्या वस्तू: 

कॅमेरा, चार्जर, एक्स्ट्रा मेमरी कार्ड, स्पाईकगार्ड (असल्यास) विंड चिटर, छत्री, टॉर्च, पाण्याची बाटली, चांगले बूट अथवा फ्लोटर्स, कपड्यांचा जोड, वैयक्तिक अंथरूण पांघरूण, प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्या (कॅमेरा व इतर गोष्टी लपेटण्यासाठी) वैयक्तिक औषधे व इतर गोष्टी इ . 


सूचना:

एकदा भरलेले शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. 

> सांगितलेल्या वेळेत व ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे. ट्रेन चुकवता येणार नाही. 

> तुम्ही संस्थेसोबत असेपर्यंत मद्य व धूम्रपानास सक्त मनाई आहे. तसे करताना कोणी आढळल्यास त्याला तिथेच निरोप दिला जाईल. 

> आपण सुजाण भटके असून आपल्या जबाबदारीवर येत आहोत याचे भान असावे. आपली वस्तू बिघडल्यास, गहाळ झाल्यास तसेच शारिरीक दुखापत अथवा हानी झाल्यास संस्थेचे सदस्य जबाबदार राहणार नाहीत. 

> भटकंती दरम्यान स्थानिक व इतर ग्रुप्सना कुठलाही उपद्रव होणार नाही तसेच निसर्गास कुठल्याही प्रकारची बाधा पोचणार नाही याची प्रत्येकाने काळजी घायची आहे. आपापला कचरा आपल्याजवळच ठेवायचा आहे.

> नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पाडण्याची संपूर्ण काळजी संस्था घेते. मात्र काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशा प्रसंगी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे. 

संपर्कः मनोज चव्हाणः 900461184 | मकरंद केतकरः 8698950909 चेतन राजगुरू: 9664941381 | सुबोध पाठारे: 9773537532


Trek to Rajmachi - Photography Special

Durgasakha charitable trust, Thane has Organised an overnight "photography special 'outing at Fort Rajmachi near Lonavala. Avid photographers Umesh Daundkar and Manoj Chavan will introduce participants to the various arrays of Landscape photography, macro photography and night photography. Rajmachi is a perfect place to explore your photography skills with various subjects such as landscapes, flora, fauna, ancient architecture, etc. Do not miss this opportunity to experience a new relationship with your camera.
Schedule:
Day 1-19 July 2014
08:45 am: Reporting at Thane station, below the indicator or platform number 1 board the local to Karjat at 9:05 am ..
12:00 pm: Arrive in Kondivade village. Post lunch start hiking. Visit Kondane caves and learn composing techniques. Enjoy waterfall and nature around and route.
7:30 pm: Reach Udhewadi village on top. Rest and free time.
9:00 pm: Dinner. Post dinner night trail, specially for the photography or herpetofauna such as frogs, snakes, geckos and moths etc. 11:30 pm: Return and rest.
Day2 - July 20, 2014
5:00 am - wake up call.
6:00 am - Visit Shiva's temple for dawn photography experience.
7:00 am - Breakfast and depart for Fort exploration. Explore Manrajan and Shrivardhan forts for architectural and landscape photography.
1:30 pm - Reach Udhewadi for lunch. 2:30 pm - Departure for Thane. 5:00 pm - Reach Karjat and board train at 5:20 pm for Thane. 7:00 pm - Arrival in Thane.


Fees: - 1100 / - (Including meals, accommodation and expertise) 


Things to carry: - Backpack, shoes / floaters, torch, water bottle, personal bed, spikegard, camera charger, extra memory card, etc.
Instructions
> Fees once paid will not be refunded under any Circumstances.
> Strictly follow reporting time as we can not miss the train.
> Smoking and drinking strictly not allowed. Defaulters will be expelled from the group.
> You are an aware camper and joining this outing on your responsibility. Under any Circumstances, for the loss or damage of things or life, organizers can not be held responsible.
> Make sure your presence will not disturb the locals or other groups in any sense. Everyone must not litter around and must take care of nature.
> Organizers willfully attempt to execute the program as per the schedule However unforeseen incidents May compel to make immediate changes in the schedule. Such cooperation is anticipated participants in case