Saturday, 25 January 2014

दुर्गसखा आयोजित ८-९ फेब्रुवारी २०१४ रोजी भारतीय इतिहास संशोधक "सचिन जोशी " यांसोबत चौल फणसाड दुर्गभ्रमण आणि इतिहासाचा वारसा

चौल : चेऊल. कुलाबा जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील एक ऐतिहासिक बंदर. शिलाहार राजांच्या राजधानीचे हे ठिकाण कुंडलिका नदीच्या मुखावर (रोहा खाडीवर), मुंबईच्या दक्षिणेस सु. ५६ किमी., अलिबाग रेवदंडा मार्गावर आहे. टॉलेमी, ह्युएनत्संग, अरबी आणि रशियन प्रवासी इत्यादींच्या वृत्तांतात याचा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी येथे आरमाराचे एक ठाणे वसविले होते. सुती व रेशमी कापड विणणे, लाकडाच्या सुबक पेट्या, पलंग वगैरे बनविणे इ. कलांत वाकबगार कारागीर येथे होते. त्यामुळे व्यापाराची खूप भरभराट झाली होती. येथील शितळादेवीचे देवस्थान पुरातन आहे. जवळच्या डोंगरातील बौद्ध लेणी व रेवदंडा (पूर्वीचे खालचे चौल) येथील पोर्तुगीज अवशेष लक्षणीय आहेत.
(संदर्भ: मराठी विश्वकोश)


* फणसाड : हे स्वातंत्र्यापूर्वी जंजिरा संस्थानाचे नबाब सिद्दी यांचे खासगी क्षेत्र होते,कोळसानिर्मिती आणि बॉक्साइट उत्खननामुळे येथील समृद्ध जमिनीचा ऱ्हास होऊ लागला. त्यामुळे वन खात्याने या क्षेत्राला अभयारण्य घोषित केले. फणसाडच्या अभयारण्यात बिबळया, कोल्हा, सांबर, भेकर, रानडुक्कर, पिसोरी, ससे, साळींदर आणि महाराष्ट्राची शान व राज्यप्राणी असणारी मोठी खार किंवा शेकरू आढळते. इथे सुमारे २०० हून अधिक जातीचे रंगीबेरंगी पक्षी आढळतात. वृक्षप्रेमींसाठी हे अभयारण्य सर्व ऋतूंत आल्हाददायक आहे. सुमारे ७०० हून अधिक वृक्ष येथे आढळून येतात. 
(संदर्भ: श्री.युवराज गुर्जर)


-------------

वेळापत्रक:
दि. ८ फेब्रुवारी | दिवस पहिला.
०६.३० am: ठाणे येथून प्रस्थान.
१०.३० am: वाटेत नाश्ता करून चौल येथे आगमन आणि स्थल दर्शन. 
०१.०० pm: चौलमधे भोजन. भोजनोत्तर पुन्हा स्थल दर्शन. संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर धमाल.
०६.३० pm: फणसाड येथे आगमन व मुक्काम.
--------------------------------------------
दि. ९ फेब्रुवारी | दिवस दुसरा
०७.०० am: तज्ञांसोबत जंगलभ्रमंती आणि पक्षीनिरीक्षण.
०१.०० pm: भोजन. भोजनोत्तर ठाण्याकडे प्रस्थान. 
०८.०० pm: ठाणे येथे आगमन.
------

शुल्कः रू. १३००/- (भोजन व प्रवास खर्चासहित)

--------

सोबत आणावयाच्या वस्तू:
स्वेटर, कपड्यांचा जोड, अंथरूण पांघरूण, टॉर्च, ताट, वाटी, पेला, पाण्याची बाटली,वैयक्तिकऔषधे इ.
-------
संपर्कः
मनोज चव्हाणः ९७७३४२११८४ | मकरंद केतकरः ८६९८९५०९०९
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१ | सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२
--

नियम व अटी
दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे.

सूचना : सर्वांनी वेळेच्या १५ मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही, तसेच सर्वांनी दिनांक ०४-०२-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नावनोंदणी रद्द केल्यास १०००रु दंड भरावा लागेल.