Saturday 21 December 2013

दुर्गसखा आयोजित “किल्ले सरसगड" येथे ५ जानेवारी २०१४ रोजी दुर्गभ्रमण



दुर्गसखा आयोजित “किल्ले सरसगड" येथे ५ जानेवारी २०१४ रोजी दुर्गभ्रमण

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. ५ जानेवारी २०१४ रोजी "सरसगड" येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दि ५ जानेवारी २०१४ रोजी ठाण्याहून प्रस्थान सरसगड येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे

सरसगड
उंची १७०० फूट ,
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम

श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. येथील गणपती‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. या गडाचा उपयोग मुख्यत… टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर’ संस्थानाकडे होती.

दुर्गभ्रमण आराखडा :-
५/०१/२०१४ रोजी
०६:३०: ठाणे येथील MANGO Showroom येथून प्रस्थान
०९:४५: पाली येथे आगमन व नाश्ता
१०:०० : सरसगडकडे प्रस्थान
१२ ते २ पर्यंत : गडमाथा गाठणे, गडफेरी,साफसफाई
०३:००: गडावरून प्रस्थान
०४:३०: भोजन
साय ०५:३०: ठाणेकडे प्रस्थान
रात्री ८:३० ला ठाणे येथे आगमन

शुल्कः रू. ८००/- (भोजन व प्रवास खर्चासहित.)

नियम व अटी :
* दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे

संपर्क:
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६ | मनाली साटम: ९६६४५०१४५८ | अजय दळवी : ९७६९५८७८०७ |तुषार पाटील: ९७०२०६४४७२

सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही, तसेच सर्वांनी दिनांक ०३-०१-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.